मोठी बातमी: होळीपूर्वी लाडक्या बहिणींना मिळणार साड्या Mazi ladki bahin news
नमस्कार मित्रांनो, Mazi ladki bahin news लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे. होळीपूर्वी सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपयांसोबत साडी पण मिळणार आहे.
Mazi ladki bahin news
महायुती सरकारने लाडक्या बहिणींवर लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी महिलांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. जसे की, सर्व महिलांना परिवहन महामंडळाच्या बस मध्ये अर्धा तिकीट प्रवास योजना आणली आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजना आणली आहे. या योजनेमध्ये सर्व पात्र महिलांना 1500 रू. त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
यामुळेच सर्व महिलांनी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला भरभरून मतदान करून निवडून आणले. आता महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील सर्व महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे.
या महिलांना मिळणार मोफत साडी
होळीच्या निमित्ताने रेशन दुकानातून साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. शिधापत्रिकाधारक महिलांना साड्या देण्यात येणार आहे. त्या संदर्भातील आदेश राज्याच्या पुरवठा विभागाने काढले आहे. लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारे शिधापत्रिकाधारक कुटुंबाच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार केले आहे. हे तयार केलेले गठ्ठे सर्व तालुक्यातील रेशन दुकानात पोहोचविण्यात येणार आहे.
होळीपर्यंत प्रत्येक सर्व लाभार्थी कुटुंबांना एक एक साडी देण्यात येणार आहे. लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना एका कार्डवर एक साडी दिली जाणार आहे.
हे ही वाचा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना धक्का बसणार! हे नवीन नियम लागू Mukhyamantri Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण धोक्यात! लाडकी बहिण योजना होणार बंद! अर्थसंकल्पानंतर होणार निर्णय ! Ladki Bahin Yojana